व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबलमध्ये योग्य आणि अयोग्य यांसाठी जे स्तर ठरवले आहेत ते आजही तितकेच उपयोगी आहेत का?

बायबलमध्ये योग्य आणि अयोग्य यांसाठी जे स्तर ठरवले आहेत ते आजही तितकेच उपयोगी आहेत का?

 अनेकांना वाटतं की बायबलमध्ये नैतिक गोष्टींबद्दल जे सांगितलं आहे, म्हणजे सेक्स किंवा लग्नाच्या बंधनाबद्दल जे सांगितलं आहे, त्याचा आजच्या काळात काही उपयोग नाही. आणि असा विचार करणाऱ्‍या लोकांमध्ये, स्वतःला ख्रिस्ती म्हणून घेणारे अनेक लोकही आहेत. शिवाय, जगाच्या या विचारांशी जुळवून घेण्यासाठी बऱ्‍याचशा चर्चमधल्या पाळकांनीसुद्धा आपल्या शिकवणींमध्ये बदल केला आहे. पण मग, बायबलमध्ये जे सांगितलं आहे ते आजही तितकंच महत्त्वाचं आहे का? हो! बायबलमध्ये नैतिक गोष्टींबद्दल जे सांगितलं आहे, ते आजही तितकंच महत्त्वाचं आहे. असं आपण का म्हणू शकतो? या लेखात आपण याबद्दलच पाहू या.

योग्य काय आणि अयोग्य काय हे समजण्यासाठी माणसांना देवाची गरज आहे

 माणसांना देवाच्या मार्गदर्शनाची गरज आहे. त्यांची निर्मिती त्याच प्रकारे करण्यात आली आहे. बायबल म्हणतं: “मनुष्य आपला मार्ग ठरवू शकत नाही. त्याला तर आपली पावलंही नीट टाकता येत नाहीत.” (यिर्मया १०:२३) हे खरंय की यहोवा a देवाने सगळ्या माणसांना स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता दिली आहे. पण, योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरवण्याची क्षमता किंवा अधिकार त्याने आपल्याला दिलेला नाही. याबाबतीत आपण त्याच्यावर अवलंबून राहावं असं त्याला वाटतं.—नीतिवचनं ३:५.

 नैतिक गोष्टींबद्दल देवाने दिलेलं मार्गदर्शन आपल्याला बायबलमध्ये सापडतं. देवाने ठरवलेले हे स्तर आजच्या काळातही आपल्यासाठी उपयोगी का आहेत याची दोन कारणं पाहा.

  •   देवाने आपल्याला निर्माण केलं आहे. (स्तोत्र १००:३) यहोवा देवानेच आपल्याला बनवलं आहे. त्यामुळे चांगल्या आरोग्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे, हे त्याला चांगल्याप्रकारे माहित आहे. आपण जर नैतिक गोष्टींबद्दल देवाने दिलेल्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष केलं, तर आपल्याला त्याचे काय परिणाम भोगावे लागतील हे त्याला माहित आहे. (गलतीकर ६:७) याशिवाय, यहोवा देवाची इच्छा आहे की आपण सर्वात चांगलं जीवन जगावं. म्हणून बायबलमध्ये देव म्हणतो: “मी तुला तुझ्या भल्यासाठी शिकवतो, आणि ज्या मार्गाने तू चाललं पाहिजेस, त्यावरून मी तुला नेतो.”—यशया ४८:१७.

  •   आपल्या इच्छा आपली दिशाभूल करू शकतात. बऱ्‍याच लोकांना असं वाटतं की आपण आपल्या मनाचं ऐकलं आणि आपल्या इच्छेप्रमाणे केलं, तर आपण बरोबर आणि चूक यातला फरक ओळखू शकतो. पण याउलट बायबलमध्ये असं म्हटलयं, “हृदय सगळ्यात जास्त धोका देणारं आहे आणि ते उतावळं आहे.” (यिर्मया १७:९) आपण जर आपल्या हृदयाचं ऐकत असलो आणि देवाच्या मार्गदर्शनानुसार काम करत नसलो, तर त्याचा आपल्याला पुढे जाऊन पस्तावा होईल.—नीतिवचनं २८:२६; उपदेशक १०:२.

बायबलमध्ये सांगितलेल्या योग्य आणि अयोग्य गोष्टींकडे धार्मिक पुढाऱ्‍यांनी दुर्लक्ष केलं पाहिजे का?

 नाही! बायबल आपल्याला देवाविषयीचं सत्यं शिकवतं आणि आपण कसं वागलं पाहिजे हेसुद्धा सांगतं. (१ करिंथकर ६:९-११; गलतीकर ५:१९-२३) शिवाय लोकांना हे सत्यं समजावं अशी देवाची इच्छा आहे. (१ तीमथ्य २:३, ४) म्हणून, सगळ्या ख्रिश्‍चनांनी बायबलमध्ये सांगितलेल्या गोष्टी इतरांना शिकवल्या पाहिजेत.—तीत १:७-९.

 बायबलमध्ये नैतिक गोष्टींबद्दल जे सांगितलं आहे ते आज अनेकजन ऐकून घेत नाहीत. असे लोक “त्यांना ऐकायच्या आहेत अशाच गोष्टी सांगतील” अशा धार्मिक शिक्षकांचा शोध घेतात. (२ तीमथ्य ४:३, तळटीप) पण तरी, देवाचं वचन आपल्याला चेतावणी देतं, की “जे चांगल्याला वाईट आणि वाइटाला चांगलं म्हणतात, त्यांचा धिक्कार असो.” (यशया ५:२०) यावरून हे स्पष्टच आहे, की जे धार्मिक नेते देवाने सांगितलेल्या योग्य आणि अयोग्य गोष्टी लोकांना चूकीच्या पद्धतीने शिकवतात त्यांचा देव हिशोब घेईल.

जे बायबलमधले नैतिक स्तर पाळत नाहीत, त्यांच्या मतांचा अनादर करायला बायबल प्रोत्साहन देतं का?

 नाही. ज्यांना देवाला खूष करायची इच्छा आहे त्यांनी येशूच्या उदाहरणाचं आणि त्याच्या शिकवणींचं अनुकरण केले पाहिजे. येशूने आपल्या अनुयायांना शिकवलं की त्यांनी इतरांचा न्याय करू नये. तर त्याऐवजी सर्वांसोबत प्रेमाने आणि आदराने वागावं.—मत्तय ५:४३, ४४; ७:१.

 येशूच्या अनुयायांना त्यांच्या जीवनात देवाच्या नैतिक स्तरांचं पालन करणं गरजेचं होतं. पण यासोबतच, त्यांना ही वस्तूस्थितीही मान्य करणं गरजेच होतं, की इतर लोकांची मतं आणि विश्‍वास वेगळा असू शकतो. (मत्तय १०:१४) राजकारणाचा किंवा इतर गोष्टींचा वापर करून देवाचे विचार आणि नैतिक स्तर इतरांवर थोपवायचा अधिकार येशूने आपल्या अनुयायांना दिलेला नाही.—योहान १७:१४, १६; १८:३६.

बायबलमध्ये सांगितलेल्या नैतिक स्तरांनुसार जीवन जगल्यामुळे काय फायदे होतात?

 जे लोक देवाने ठरवलेल्या नैतिक स्तरांनुसार जीवन जगायचा प्रयत्न करतात, ते आत्ताही आनंदी राहतात आणि भविष्यातसुद्धा त्यांना अनेक फायदे मिळतील. (स्तोत्रं १९:८, ११) त्यांपैकी काही म्हणजे:

a बायबलमध्ये देवाचं नाव ‘यहोवा’ असं दिलं आहे.—स्तोत्र ८३:१८.