व्हिडिओ पाहण्यासाठी


चर्चेतून बायबल अभ्यास

कायम जीवनाचा आनंद घ्या!

या मोफत केल्या जाणाऱ्‍या बायबल अभ्यासाच्या चर्चेतून तुम्हाला यांसारख्या प्रश्‍नांची उत्तरं मिळतील:

  • मी आनंदी कसं राहू शकतो?

  • वाईट गोष्टी आणि दुःख कधी संपेल का?

  • मृत्यूमुळे गमावलेले माझे जवळचे लोक पुन्हा जिवंत होतील का?

  • देवाला माझी खरंच काळजी आहे का?

  • माझ्या प्रार्थना कशा असल्या पाहिजेत? आणि देवाने त्या ऐकाव्यात म्हणून मी काय केलं पाहिजे?

मोफत

या संपूर्ण चर्चेसाठी आणि कायम जीवनाचा आनंद घ्या!  या प्रकाशनासाठी तुमच्याकडून कोणतीही फी घेतली जाणार नाही. तुम्हाला हवं असेल तर बायबलसुद्धा मोफत मिळेल.

तुमच्या सोयीनुसार

तुमच्या वेळेनुसार आणि तुम्हाला जमेल तिथे तुम्ही चर्चेसाठी समोरासमोर किंवा ऑनलाईन भेटू शकता.

कोणतीही जबरदस्ती नाही

तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही हा अभ्यास थांबवू शकता.

बायबलवर ही चर्चा कशी केली जाईल?

तुम्हाला बायबलच्या एकेका विषयाची माहिती घ्यायला तुमच्याजवळ राहणारा एखादा यहोवाचा साक्षीदार तुम्हाला मदत करेल. कायम जीवनाचा आनंद घ्या!  या प्रकाशनाच्या मदतीने चर्चा केली जाईल. या अभ्यासामुळे तुम्हाला बायबलचे मुख्य विषय क्रमाक्रमाने समजून घेता येतील. तसंच, ही माहिती तुमच्यासाठी कशी उपयोगाची आहे हेसुद्धा तुम्हाला कळेल. जास्त माहितीसाठी हा व्हिडिओ किंवा सहसा विचारले जाणारे प्रश्‍न पाहा.

हे प्रकाशन कसं आहे हे पाहायचं आहे का?

सुरुवातीच्या काही धड्यांची एक झलक पाहा.

मग तुम्ही तयार आहात का?

पहिली चर्चा कधी आणि केव्हा करायची हे ठरवण्यासाठी खाली क्लिक करा.