व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सध्याच्या जीवनापेक्षा आणखी चांगलं जीवन कसं मिळवता येईल?

सध्याच्या जीवनापेक्षा आणखी चांगलं जीवन कसं मिळवता येईल?

देवाला जसं हवं होतं तसं जीवन आज मानव जगत नाही. खरंतर, पृथ्वी अशा लोकांनी भरून जायला हवी होती जे सृष्टिकर्त्याच्या अधिकाराचा आदर करतात, त्याच्या मार्गदर्शनाचं पालन करतात आणि त्याच्यासारखं प्रेम आणि इतर सुंदर गुण दाखवतात. तसंच, देवाची इच्छा होती की जसजशी कुटुंबं वाढत जातील तसतशी त्यांनी आनंदाने एकमेकांना साथ द्यावी, नवीन गोष्टींचा शोध लावावा आणि पृथ्वीला सुंदर बागेसारखं बनवावं.

पृथ्वीसाठी देवाने जे ठरवलं होतं त्यानुसार बदल करण्याचं तो अभिवचन देतो

  • “तो दिगंतापर्यंत लढाया बंद करतो.”स्तोत्र ४६:९.

  • “पृथ्वीचा नाश करणाऱ्‍यांचा नाश करण्याची नियुक्‍त वेळ आली.”प्रकटीकरण ११:१८.

  • “मी रोगी आहे असे एकही रहिवासी म्हणणार नाही.”यशया ३३:२४.

  • “माझे निवडलेले आपल्या हाताच्या श्रमाचे फळ पूर्णपणे भोगतील.”यशया ६५:२२.

या भविष्यवाण्या कशा पूर्ण होतील? देवाचं स्वर्गात एक परिपूर्ण सरकार आहे आणि त्याचा राजा होण्यासाठी देवाने आपल्या मुलाला, येशूला निवडलं आहे. लवकरच येशू स्वर्गातून पृथ्वीवर राज्य करेल. बायबलमध्ये या सरकारला देवाचं राज्य असं म्हटलं आहे. (दानीएल २:४४) बायबल येशूबद्दल म्हणतं: देव त्याला “सिंहासन देईल आणि राजा या नात्याने तो . . . राज्य करेल.”—लूक १:३२, ३३.

येशू पृथ्वीवर असताना त्याने बरेच चमत्कार केले. असं करून त्याने दाखवून दिलं की आजच्या जीवनाच्या तुलनेत त्याच्या राज्यात मानवांचं जीवन कितीतरी पटीने चांगलं असेल.

येशू आज्ञाधारक मानवांसाठी कोणत्या चांगल्या गोष्टी करेल हे त्याने दाखवून दिलं

  • येशूने सर्व प्रकारचे रोग बरे करून दाखवून दिलं की तो मानवांना आजारांपासून मुक्‍त करेल.मत्तय ९:३५.

  • त्याने समुद्राला शांत करून दाखवून दिलं की तो निसर्गावर ताबा ठेवून मानवांचं रक्षण करेल.मार्क ४:३६-३९.

  • त्याने हजारो लोकांना जेवू घातलं आणि दाखवून दिलं की तो मानवांच्या मूलभूत गरजा पूर्ण करेल.मार्क ६:४१-४४.

  • त्याने एका लग्नात पाण्याचं रूपांतर द्राक्षारसात केलं आणि असं करून दाखवून दिलं की तो मानवांना जीवनाचा आनंद घेण्यासाठी मदत करेल.योहान २:७-११.

देवावर प्रेम असणाऱ्‍या लोकांना त्याला एक चांगलं जीवन देण्याची इच्छा आहे. आपण ते जीवन कशा प्रकारे मिळवू शकतो? यासाठी तुम्हाला एक “रस्ता” निवडावा लागेल. बायबल याबद्दल म्हणतं की जीवनाकडे जाणारा एक “रस्ता . . . आहे व फार कमी लोकांना तो सापडतो.”—मत्तय ७:१४.

चांगल्या जीवनाकडे घेऊन जाणारा रस्ता

जीवनाकडे जाणारा रस्ता म्हणजे काय? देव आपल्याला देत असलेल्या मार्गदर्शनाला हा रस्ता सूचित करतो. देवाने म्हटलं: “तुला जे हितकारक ते मी परमेश्‍वर तुझा देव तुला शिकवतो; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो.” (यशया ४८:१७) आपण जर या सल्ल्याचं पालन केलं तर आपल्याला चांगलं जीवन जगता येईल.

येशूने म्हटलं: “मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे.” (योहान १४:६) जर आपण येशूने सांगितलेल्या गोष्टींचं पालन केलं आणि त्याने मांडलेल्या उदाहरणाचं अनुकरण केलं तर देवासोबतचं आपलं नातं घनिष्ठ होईल आणि आपल्याला चांगलं जीवन जगता येईल.

जीवनाचा रस्ता आपल्याला कसा सापडू शकतो? आज लोक वेगवेगळ्या पद्धतीने देवाची उपासना करतात. पण येशूने इशारा दिला: “मला ‘प्रभू, प्रभू,’ म्हणणारा प्रत्येक जण स्वर्गाच्या राज्यात जाणार नाही, तर स्वर्गातील माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करणाराच त्या राज्यात जाईल.” (मत्तय ७:२१) आणि त्यासोबत त्याने हेही म्हटलं: “तुम्ही त्यांच्या फळांवरून त्यांना ओळखाल.” (मत्तय ७:१६) बायबल आपल्याला उपासना करण्याची योग्य पद्धत ओळखण्यासाठी आणि ती उपासनेच्या इतर पद्धतींपासून कशी वेगळी आहे हे समजण्यासाठी मदत करतं.—योहान १७:१७.

जीवनाच्या रस्त्यावर आपण कसं चालू शकतो? ज्याने सर्वांना जीवन दिलं त्या देवाबद्दल आपल्याला शिकून घ्यावं लागेल. जसं की तो कोण आहे? त्याचं नाव काय आहे? त्याच्यात कोणते गुण आहेत? तो आपल्यासाठी काय करत आहे? आणि तो आपल्याकडून काय अपेक्षा करतो? *

मानवांनी काम करावं, खावं-प्यावं, जीवनाचा आनंद घ्यावा आणि कुटुंब वाढवावं एवढीच देवाची इच्छा नाही. खरंतर, आपण आपल्या सृष्टिकर्त्याला ओळखावं आणि त्याच्याशी मैत्री करावी अशीही त्याची इच्छा आहे. आणि हे करणं शक्य आहे. त्याच्या इच्छेप्रमाणे वागून आपण दाखवू शकतो की आपलं त्याच्यावर प्रेम आहे. येशूने म्हटलं: “सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी हे आवश्‍यक आहे, की त्यांनी एकाच खऱ्‍या देवाला . . . ओळखावं.”—योहान १७:३.

देव बायबलद्वारे आपल्याला “हितकारक” गोष्टी शिकवतो.​—यशया ४८:१७

आपल्या प्रवासाचं पहिलं पाऊल उचलणं

देव आपल्याकडून काय अपेक्षा करतो हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपल्याला काही बदल करावे लागू शकतात. हे बदल करणं आपल्याला अवघड जाऊ शकतं. खरंतर हा प्रवास खूप सुंदर आहे. इतर कोणत्याही प्रवासासारखं या प्रवासाची सुरुवात करण्यासाठीही आपल्याला पहिलं पाऊल उचलावं लागेल. देवाबद्दल असलेल्या काही मूलभूत प्रश्‍नांची उत्तरं मिळवण्यासाठी यहोवाचे साक्षीदार तुम्हाला मदत करतील आणि तुमच्या सोईच्या वेळी आणि ठिकाणी ते तुमच्यासोबत मोफत बायबल अभ्यास करतील. www.isa4310.com/mr या वेबसाइटद्वारे तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता.