व्हिडिओ पाहण्यासाठी

तरुण लोक विचारतात

बायबल वाचल्यामुळे काय फायदा होईल?​—भाग १: सुरुवात अशी करा

बायबल वाचल्यामुळे काय फायदा होईल?​—भाग १: सुरुवात अशी करा

 “मी बऱ्‍याचदा बायबल वाचायचा प्रयत्न केलाय, पण इतकं मोठं पुस्तक पाहून कंटाळा येतो.”​—ब्रियाना, १५.

 तुम्हालाही असंच वाटतं का? मग हा लेख तुमच्यासाठीच आहे.

 बायबल का वाचलं पाहिजे?

 बायबल वाचायला तुम्हाला जिवावर येतं का? जर असं असेल, तर आम्ही हे समजू शकतो. कारण तुम्ही विचार करत असाल की ‘बायबल हे हजारो पानांचं मोठ्ठंच्या मोठ्ठं पुस्तक आहे. आणि त्यात तर फक्‍त माहिती दिली आहे; चित्रंसुद्धा नाहीत. त्यापेक्षा टीव्ही आणि व्हिडिओ बघणं परवडलं.’

 पण आता जरा असा विचार करून पाहा. जर तुम्हाला जुन्या काळातली एक मोठी खजिन्याची पेटी सापडली, तर त्या पेटीच्या आत काय असेल हे जाणून घ्यायची तुम्हाला उत्सुकता वाटणार नाही का?

 बायबलसुद्धा त्या खजिन्याच्या पेटीसारखंच आहे. त्यात तुम्हाला मौल्यवान रत्नं सापडतील, म्हणजेच बुद्धी देणारी माहिती सापडेल जिच्यामुळे तुम्हाला

  •   चांगले निर्णय घेता येतील

  •   आपल्या आईवडिलांशी जुळवून घेता येईल

  •   चांगले मित्र बनवता येतील आणि

  •   तणावाचा सामना करता येईल

 बायबल तर एवढं जुनं आहे, मग आज याचा फायदा कसा काय होऊ शकतो? कारण बायबल “देवाच्या प्रेरणेने लिहिलेलं” आहे. (२ तीमथ्य ३:१६) म्हणजेच बायबलमधली माहिती ही या विश्‍वातल्या सगळ्यात बुद्धिमान व्यक्‍तीकडून आहे.

एका खजिन्याच्या पेटीप्रमाणे बायबलमध्येही बुद्धी देणारी मौल्यवान रत्नं आहेत

 बायबल कसं वाचावं?

 बायबल वाचायची एक पद्धत म्हणजे ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचून काढणं. असं केल्यामुळे तुम्हाला बायबलचा मुख्य विषय किंवा सार काय आहे ते समजेल. पूर्ण बायबल वाचायच्या तशा बऱ्‍याचशा पद्धती आहेत. पण याची दोन उदाहरणं पाहा:

  •    तुम्ही उत्पत्ती ते प्रकटीकरण पर्यंत बायबलची ६६ पुस्तकं एकेक करून वाचू शकता.

  •    बायबलमधल्या घटना इतिहासात ज्या क्रमाने घडल्या, त्या क्रमाने तुम्ही त्या वाचू शकता.

 टीप: नवे जग भाषांतर  यातल्या अतिरिक्‍त लेख क७ मध्ये येशूच्या पृथ्वीवरच्या जीवनातल्या महत्त्वाच्या घटनांची क्रमवार सूची दिली आहे.

 बायबल वाचायची दुसरी पद्धत म्हणजे तुमच्यासमोर असलेल्या प्रॉब्लेम्सच्या संबंधित एखादा अहवाल वाचणं. जसं की:

 टीप: बायबल वाचताना एखाद्या शांत ठिकाणी बसा, म्हणजे तुम्हाला लक्ष देऊन वाचणं सोपं जाईल.

 बायबल वाचायची एक तिसरी पद्धतही आहे. तुम्ही एखादा अहवाल किंवा एखादं स्तोत्र निवडू शकता, ते वाचू शकता आणि मग  ते तुमच्या परिस्थितीला कसं लागू होतं यावर विचार करू शकता. वाचल्यावर स्वतःला हे प्रश्‍न विचारा:

  •    यहोवाने ही माहिती बायबलमध्ये का दिली असेल?

  •    यावरून यहोवाच्या गुणांबद्दल आणि तो कशा प्रकारे काम करतो याबद्दल काय कळतं?

  •    या माहितीचा मला माझ्या जीवनात कसा उपयोग करता येईल?

 टीप: एक ध्येय ठेवा. jw.org वर दिलेल्या बायबल वाचनाच्या आराखड्याच्या मदतीने तुम्ही बायबल वाचायला कधी सुरुवात करणार याची एक नेमकी तारीख लिहून ठेवा.