व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

Maremagnum/Corbis Documentary via Getty Images

जागे राहा!

हर्मगिदोनच्या लढाईची सुरुवात इस्राएलमधून होईल का?—बायबल काय म्हणतं?

हर्मगिदोनच्या लढाईची सुरुवात इस्राएलमधून होईल का?—बायबल काय म्हणतं?

 बायबलमध्ये हर्मगिदोनच्या युद्धाबद्दल सांगितलंय. पण बायबल म्हणतं, हे कोणत्याही दोन देशांत किंवा कोणत्याही प्रदेशात होणारं युद्ध नाही, तर पृथ्वीवर असलेल्या सगळ्या मानवी सरकारांमधलं आणि खऱ्‍या देवामधलं युद्ध असेल.

  •   “दुष्ट स्वर्गदूतांनी प्रेरित केलेली वचनं . . . . संपूर्ण पृथ्वीवरच्या राजांकडे जाऊन त्यांना सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाच्या युद्धासाठी एकत्र करतात. . . . त्यांनी इब्री भाषेत हर्मगिदोन म्हटलेल्या ठिकाणी सर्व राजांना एकत्र आणलं.”—प्रकटीकरण १६:१४, १६.

 “हर्मगिदोन” हा शब्द “हर-मेगिद्दोन” या हिब्रू शब्दापासून आला आहे. त्याचा अर्थ “मगिद्दोचे पर्वत” असा होतो. मगिद्दो हे शहर प्राचीन इस्राएलमध्ये होतं. आणि म्हणूनच बऱ्‍याच लोकांना असं वाटतं, की हर्मगिदोनचं युद्ध आजच्या इस्राएल देशामध्ये होईल. पण ‘संपूर्ण पृथ्वीवरचे राजे’ आणि त्यांचं सैन्य मावेल इतका मोठा प्रदेश मगिद्दोमध्येही नाही, आणि मध्य-पूर्वेतल्या इतर कोणत्याही देशात नाही.

 बायबलमधलं प्रकटीकरणाचं पुस्तक हे “चिन्हांच्या रूपात” किंवा लाक्षणिक भाषेत लिहिण्यात आलं होतं. (प्रकटीकरण १:१) त्यामुळेच, हर्मगिदोन हे कोणत्याही एका विशिष्ट ठिकाणाला किंवा जागेला सूचित करत नाही. तर, सगळी राष्ट्रं त्यांचा शेवट होण्याआधी, जेव्हा देवाच्या शासनाच्या विरोधात एकत्र येतील त्या जागतिक परिस्थितीला सूचित करतं.—प्रकटीकरण १९:११-१६, १९-२१.