व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ilbusca/E+ via Getty Images

जागे राहा!

लोक एकमेकांसोबत शांतीने का राहू शकत नाहीत?​—⁠बायबल काय म्हणतं?

लोक एकमेकांसोबत शांतीने का राहू शकत नाहीत?​—⁠बायबल काय म्हणतं?

 जगातले नेते आणि आंतरराष्ट्रीय संघटना शांती आणू शकलेल्या नाहीत. दुसऱ्‍या महायुद्धापासून आतापर्यंत झाल्या नाहीत इतक्या हिंसेच्या घटना आज घडतायत. जवळ-जवळ २ अब्ज लोक (जगाच्या लोक संख्येचा चौथा भाग) अशा ठिकाणी राहतात, जिथे या घटना घडत आहेत.

 माणसं शांती का आणू शकत नाहीत? याबद्दल बायबल काय म्हणतं?

या तीन कारणांमुळे माणसं शांती आणू शकत नाहीत

  1.  १. माणसांमध्ये अशी वृत्ती दिसून येते, जिच्यामुळे ते शांतीने राहण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाहीत. आपल्या काळाबद्दल बायबलमध्ये असं म्हणण्यात आलंय, की ‘लोक फक्‍त स्वतःवर प्रेम करणारे, पैशावर प्रेम करणारे, बढाई मारणारे, गर्विष्ठ, उपकारांची जाण न ठेवणारे, कोणत्याही गोष्टीशी सहमत न होणारे, संयम नसलेले, क्रूर, अडेल वृत्तीचे, गर्वाने फुगलेले’ असे असतील.​—२ तीमथ्य ३:२-४.

  2.  २. यहोवा a देवाच्या मदती शिवाय, माणसं स्वतः किंवा सगळे मिळूनही आपल्या समस्या सोडवू शकत नाहीत. बायबलमध्ये असंही म्हटलंय, “मनुष्य आपला मार्ग ठरवू शकत नाही. त्याला तर आपली पावलंही नीट टाकता येत नाहीत.”​—यिर्मया १०:२३

  3.  ३. हे जग एका शक्‍तिशाली आणि दुष्ट शासकाच्या नियंत्रणाखाली आहे. तो म्हणजे ‘संपूर्ण पृथ्वीवरच्या लोकांना फसवणारा’ सैतान. (प्रकटीकरण १२:९) जोपर्यंत, “सगळं जग सैतानाच्या नियंत्रणात आहे” तोपर्यंत युद्ध आणि हिंसा होतच राहील.​—१ योहान ५:१९.

खरी शांती कोण आणू शकतं?

 बायबलमधून आपल्याला या गोष्टीची खातरी मिळते, की पृथ्वीवर शांती नक्की येईल. पण ही शांती माणसं नाही तर फक्‍त देवच आणेल.

  •   “यहोवा म्हणतो, ‘तुमच्यासाठी माझे काय विचार आहेत, हे मला चांगलं माहीत आहे. ते विचार शांतीचे आहेत; संकटाचे नाहीत. ते तुम्हाला चांगलं भविष्य आणि आशा देणारे आहेत.’”​—यिर्मया २९:११.

 देव हे वचन कसं पूर्ण करेल? “शांती देणारा देव लवकरच सैतानाला . . . चिरडून टाकेल.” (रोमकर १६:२०) यासाठी देव स्वर्गातल्या आपल्या सरकाराचा वापर करेल. जगभरात शांती आणणाऱ्‍या या सरकाराला बायबलमध्ये, देवाचं राज्य असं म्हटलंय. (लूक ४:४३) येशू ख्रिस्त देवाच्या राज्याचा राजा आहे. आणि शांतीने कसं राहायचं हे तो लोकांना शिकवेल.​—यशया ९:६, ७.

a यहोवा हे देवाचं वैयक्‍तिक नाव आहे.​—स्तोत्र ८३:१८.