व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

TheCrimsonMonkey/E+ via Getty Images

खास मोहीम

पर्यावरणाच्या समस्या—देवाचं राज्य याबद्दल काय करेल

पर्यावरणाच्या समस्या—देवाचं राज्य याबद्दल काय करेल

 “वेगाने बदलणाऱ्‍या वातावरणाची लोकांना, शहरांना आणि पर्यावरणाला झळ बसतेय. या बदलांमुळे येणारी वादळं आणखी मोठी आणि भयानक होत चालली आहेत. या वादळांनी जगभरात लोकांची घरं आणि त्यांचं जीवन उद्धवस्त होतंय. महासागरांचं तापमान वाढत चाललंय. त्यामुळे त्यांतले बरेच जीव मरत आहेत.”—इन्गर ॲन्डरसन, संयुक्‍त राष्ट्र संघाचे उप महासचिव आणि संयुक्‍त राष्ट्र संघ पर्यावरण कार्याक्रमाचे कार्यकारी संचालक, २५ जुलै २०२३.

 या जागतिक समस्या सोडवण्यासाठी जगातली सरकारं एकत्र येतील का? ही सरकारं या समस्या कायमच्या सोडवू शकतात का?

 बायबल एका अशा सरकाराबद्दल सांगतं, जे पर्यावरणाच्या समस्या सोडवू शकतं आणि ते त्या समस्या सोडवेलसुद्धा. त्यात म्हटलंय: ‘स्वर्गाचा देव एक राज्य स्थापन करेल.’ हे असं सरकार आहे जे पृथ्वीवरचा सगळा कारभार सांभाळेल. (दानीएल २:४४) या जागतिक सरकाराच्या अधीन असलेले लोक, “कोणालाही त्रास देणार नाहीत,” किंवा पृथ्वीचं “कोणतंही नुकसान करणार नाहीत.”—यशया ११:९.