व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबल प्रश्नांची उत्तरं

बायबल प्रश्नांची उत्तरं

जगातील गरिबी कधी नाहीशी होईल का?

गरिबी नसलेलं जग देव कसं आणेल?—मत्तय ६:९, १०.

कमालीच्या गरिबीमुळं लोक कुपोषित होतात, आजारी पडतात. आणि यामुळं दर वर्षी कोट्यवधी लोक मरण पावतात. जगातील काही देश श्रीमंत असले तरीसुद्धा, बहुतांश लोक कमालीच्या गरिबीत जगत आहेत. मानवजातीत गरिबीची समस्या फार जुनी आहे, असं बायबलमध्ये सूचित करण्यात आलं आहे.—योहान १२:८ वाचा.

संपूर्ण जगातील गरिबी काढून टाकण्यासाठी एका जागतिक सरकाराचीच आवश्यकता आहे. या सरकाराकडं, जगात उत्पन्न होणाऱ्या अन्न धान्याचं समप्रमाणात वाटप करण्याची शक्ती असली पाहिजे तसंच गरिबीला कारणीभूत असलेली युद्धं थांबवण्याची ताकद असली पाहिजे. हे अशा प्रकारचं जागतिक सरकार आणण्याचं वचन यहोवा देव देतो.—दानीएल २:४४ वाचा.

हे जागतिक सरकार गरिबीचा अंत कसा करेल?

देवानं त्याचा पुत्र येशू याला सर्व मानवजातीवर राज्य करण्याचा अधिकार सोपवला आहे. (स्तोत्र २:४-८) येशू गरिबांना वाचवणार आहे आणि जुलूम व हिंसाचार यांचा अंत करणार आहे.—स्तोत्र ७२:८, १२-१४ वाचा.

बायबलमध्ये येशूला “शांतीचा अधिपती” म्हटलं आहे. तो संपूर्ण जगात शांती व सुरक्षितता आणेल. तेव्हा पृथ्वीवरील सर्व लोकांचं स्वतःचं घर असेल. त्यांच्या मनासारखं काम असेल आणि सर्वांना पोटभर खायला मिळेल.—यशया ९:६, ७; ६५:२१-२३ वाचा. (w15-E 10/01)