व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कुठं आहे देव?

कुठं आहे देव?

कुठं आहे देव?

सप्टेंबर ११, २००१:सकाळी ८:४६ वाजता, न्यू यॉर्क सिटीतील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या उत्तरेकडील इमारतीवर एक विमान येऊन धडकले. दहशतवाद्यांनी आयोजित केलेल्या हल्ल्यांच्या मालिकेतील हा पहिला हल्ला होता. पुढील १०२ मिनिटांत, जवळजवळ ३,००० लोक मृत्यूमुखी पडले.

डिसेंबर २६, २००४

हिंदी महासागरात आलेल्या ९.० तीव्रतेच्या भूकंपामुळे निर्माण झालेल्या महालाटांचा ११ राष्ट्रांना तसेच समुद्रापासून सुमारे ५,००० किलोमीटर दूर असलेल्या आफ्रिकेला देखील फटका बसला. एका दिवसात, १,५०,००० लोक एकतर मृत्यूमुखी पडले किंवा हरवले आणि दहा लाखापेक्षा अधिक लोक बेघर झाले.

ऑगस्ट १, २००९: एक ४२ वर्षीय मनुष्य आपल्या ५ वर्षांच्या मुलासह सुसाट्याने धावणाऱ्‍या नावेत बसून जलविहार करत होता. पण त्यांची नाव एका लाकडी गोदीवर जाऊन धडकली. हा मनुष्य जागीच मरण पावला आणि त्याचा मुलगा मृत्यूशी झुंज देत दुसऱ्‍या दिवशी मरण पावला. “काही तरी चमत्कार होईल आणि मुलगा तरी वाचेल, अशी आम्ही आशा करत होतो,” असे त्यांच्या एका शोकग्रस्त नातेवाईकाने म्हटले.

तुम्ही जेव्हा दहशतवादी हल्ल्यांविषयी किंवा नैसर्गिक आपत्तींविषयी ऐकता अथवा तुमच्यावर जेव्हा एखादा दुःखद प्रसंग ओढवतो तेव्हा, जे काही होत आहे त्याकडे देवाचे लक्ष आहे का, असा प्रश्‍न तुमच्याही मनात येतो का? देवाने आपल्याला सोडून दिले आहे, असे तुम्हालाही वाटते का? बायबलमध्ये या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे दिली आहेत. पाहू या ती उत्तरे. (w१०-E ०५/०१)

[३ पानांवरील चित्राचे श्रेय]

© Dieter Telemans/Panos Pictures

PRAKASH SINGH/AFP/Getty Images

© Dieter Telemans/Panos Pictures