व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

मंडळी जेव्हा प्रभूच्या सांज भोजनाचा स्मारकविधी साजरा करत असते तेव्हा आजारी असलेल्या एखाद्या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनाला उपस्थित राहता येत नसल्यास त्याच्यासाठी काही पर्यायी व्यवस्था केली जाऊ शकते का?

होय. मंडळी जेव्हा प्रभूच्या सांज भोजनाचा स्मारकविधी साजरा करते तेव्हा आजारी किंवा कदाचित अंथरुणाला खिळलेल्या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनाला उपस्थित राहता येत नसल्यास काही पर्यायी व्यवस्था करता येते आणि ती केलीच पाहिजे. अशा वेळी, वडील वर्ग एखाद्या वडिलांना अथवा इतर कोणत्याही प्रौढ ख्रिस्ती पुरुषाला, प्रतिकात्मक भाकरीचे काही तुकडे आणि थोडासा द्राक्षारस अभिषिक्‍त ख्रिश्‍चनाकडे त्याच दिवशी सूर्योदयाआधी घेऊन जाण्याची व्यवस्था करू शकतात.

परिस्थितीनुसार, हे भेट देणारे वडील अथवा बांधव संक्षिप्त टिपणी करून उचित वचने वाचू शकतात. येशूने, प्रभूच्या सांज भोजनाच्या स्मारकविधीची स्थापना केली तो नमुना हे बांधव अथवा वडील अनुसरू शकतात. जसे की, ते मत्तय २६:२६ वाचू शकतात आणि त्यांच्यापैकी एक जण प्रार्थना करून मग बेखमीर भाकर अभिषिक्‍त व्यक्‍तीला देऊ शकतात. नंतर ते, मत्तयाच्या २६ अध्यायाची २७ आणि २८ वचने वाचून प्रार्थना करून मग द्राक्षारस देऊ शकतात. प्रत्येक बोधचिन्हाच्या महत्त्वावर संक्षिप्त टिपणी करून मग ते समाप्तीची प्रार्थना करू शकतात.

मंडळी जेव्हा प्रभूच्या सांज भोजनाचा स्मारकविधी साजरा करते तेव्हा सर्वांनी उपस्थित राहण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला पाहिजे, हे खरे आहे. परंतु, अगदीच अशक्य परिस्थितीत, जसे की प्रकृती गंभीर असल्यास, इस्पितळात असल्यास किंवा इतर कारणामुळे निसान १४ तारखेला सूर्यास्तानंतर स्मारकविधी पाळता येत नसल्यास एखाद्या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनासाठी कोणती पर्यायी व्यवस्था केली जाऊ शकते? अशा अभिषिक्‍त व्यक्‍तीने, मोशेच्या नियमशास्त्रात सांगितलेल्या घटनेप्रमाणे, स्मारकविधीच्या ठीक ३० दिवसांनंतर तो खासगीत साजरा करावा.—गणना ९:९-१४.