व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सर्वांकरता उत्तम आरोग्य—लवकरच!

सर्वांकरता उत्तम आरोग्य—लवकरच!

सर्वांकरता उत्तम आरोग्य—लवकरच!

फोकस या जर्मन वृत्तपत्रिकेनुसार “पूर्णपणे रोगमुक्‍त होण्याची कल्पना . . . सध्या लोकप्रिय आहे.” पण ही कल्पना काही नवीन नाही. मानवी जीवनाची सुरवात झाली तेव्हा निर्माणकर्त्याची अशीच इच्छा होती की मानवांनी कधीही आजारी पडू नये. मानवजातीकरता त्याचा उद्देश केवळ “सर्वांना समाधानकारक प्रमाणात आरोग्य” असावे असा नव्हता. (तिरपे वळण आमचे.) तर आपल्या निर्माणकर्त्याचा उद्देश असा होता की सर्वांना परिपूर्ण आरोग्य असावे!

मग सर्वांना आजारपणाला का तोंड द्यावे लागते? बायबल आपल्याला सांगते की यहोवा देवाने आदाम व हव्वा या मानवजातीच्या प्रथम आईवडिलांना परिपूर्ण स्थितीत निर्माण केले होते. निर्मिती केल्यानंतर, “आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले.” मानवांच्या जीवनावर रोगराई व मृत्यूचे सावट यावे अशी त्याची कधीही इच्छा नव्हती. पण जेव्हा आदाम व हव्वेने त्यांना सांगितलेल्या मार्गावर चालण्याचे सोडून दिले तेव्हा त्यांनी पाप केले. आदामाने केलेल्या पापाचा परिणाम मृत्यू होता आणि तो सर्व मनुष्यांत पसरला.—उत्पत्ति १:३१; रोमकर ५:१२.

यहोवाने मानवजातीला कायमचे सोडून दिले नाही. तसेच त्यांच्याकरता आणि पृथ्वीकरता असलेला आपला उद्देशही त्याने बदलला नाही. सबंध बायबलमध्ये त्याने आज्ञाधारक मानवजातीला सुरवातीचे उत्तम आरोग्य पुन्हा देण्याचा आपला उद्देश प्रकट केला आहे. देवाचा पुत्र, येशू ख्रिस्त अद्याप पृथ्वीवर असताना त्याने कित्येकदा दाखवून दिले की देवाला आजार बरे करण्याचे सामर्थ्य आहे. उदाहरणार्थ, येशूने आंधळेपण, कुष्ठरोग, बहिरेपण, जलोदर, मिर्गी आणि लकवा यांसारखे रोग बरे केले.—मत्तय ४:२३, २४; लूक ५:१२, १३; ७:२२; १४:१-४; योहान ९:१-७.

देव लवकरच आपला मशीही राजा येशू ख्रिस्त याला मानवजातीचा व या जगाचा कारभार हाती घेण्यास सांगेल. त्याच्या शासनाखाली, यशयाची भविष्यवाणी पूर्ण होईल: “मी रोगी आहे असे एकहि रहिवासी म्हणणार नाही. तेथे राहणारे पातकाची क्षमा पावतात.” (यशया ३३:२४) हे कसे घडेल?

लोकांच्या ‘पातकांची क्षमा केली जाईल’ असे यशया म्हणतो हे लक्षात घ्या. याचा अर्थ, रोगराईचे मूळ कारण, अर्थात मानवांना आनुवंशिकतेने मिळालेले पाप काढून टाकले जाईल. कसे? येशूच्या खंडणी बलिदानाचे मोल आज्ञाधारक मानवजातीकरता उपयोगात आणले जाईल आणि या आधारावर रोगराई आणि मृत्यूचा संपूर्ण नायनाट केला जाईल. पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यात परादीसमय परिस्थिती येईल. ख्रिस्ती प्रेषित योहानाने लिहिले: “[देव] त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.” हे लवकरच घडणार आहे!—प्रकटीकरण २१:३, ४; मत्तय, अध्याय २४; २ तीमथ्य ३:१-५.

समतोल साधणे

दरम्यान, बरेच लोक आजारपणाला आणि रोगराईला बळी पडत आहेत. त्याअर्थी, आपल्या आणि आपल्या प्रिय माणसांच्या आरोग्याविषयी काळजी वाटणे अगदी साहजिक आहे.

आज ख्रिस्ती लोक वैद्यकीय क्षेत्रातल्या कर्मचाऱ्‍यांच्या प्रयत्नांची मनापासून कदर करतात. ते आपले आरोग्य टिकवून ठेवण्याकरता आपल्या परीने होईल तितका प्रयत्न करतात. पण बायबल आश्‍वासन देते, की भविष्यात रोगराई राहणारच नाही. हे आश्‍वासन आपल्याला या बाबतीत संतुलित मनोवृत्ती ठेवण्यास मदत करते. मशिही राज्य मानवजातीचा सर्व कारभार आपल्या हाती घेत नाही तोपर्यंत, परिपूर्ण आरोग्य असणे शक्यच नाही. आपण आधी पाहिल्याप्रमाणे, अनेक सनसनाटी शोध लागूनही, झाडाच्या शेंड्यावरील सर्वात रसाळ आंबा अर्थात सर्वांकरता उत्तम आरोग्य, वैद्यकीय शास्त्राच्या हाती अद्याप लागलेला नाही.

“जगातील सर्व लोकांना समाधानकारक आरोग्य मिळवून देण्याचे” ध्येय लवकरच वास्तवात उतरवले जाईल. पण संयुक्‍त राष्ट्रांच्या किंवा जागतिक आरोग्य संघटनेच्या किंवा पर्यावरणवादी कार्यकर्त्यांच्या किंवा समाजसेवकांच्या किंवा डॉक्टरांच्या प्रयत्नांनी नव्हे. हा बहुमान येशू ख्रिस्ताकरता राखून ठेवण्यात आला आहे. मानवजात शेवटी ‘नश्‍वरतेच्या दास्यातून मुक्‍त होईल आणि तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्‍त मुक्‍तता मिळेल’ तेव्हा या पृथ्वीवर किती आनंददायक परिस्थिती असेल!—रोमकर ८:२१. (g०१ ६/८)

[१० पानांवरील चित्रे]

देवाच्या नव्या जगात सर्वांना उत्तम आरोग्य मिळेल