व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

शारीरिक आरोग्य

शारीरिक आरोग्य

बायबल एक वैद्यकीय पुस्तक नाही. असं असलं तरी यात दिलेल्या सल्ल्यांमुळे आपण एक आरोग्यदायी जीवन जगू शकतो. आता आपण अशा काही बायबलमधल्या तत्त्वांवर चर्चा करू या ज्यामुळे आपल्याला निरोगी राहता येईल.

आपल्या शरीराची काळजी घ्या

बायबल तत्त्व: “कोणताही मनुष्य स्वतःच्या शरीराचा द्वेष करत नाही; उलट, तो त्याचे पालनपोषण करतो.”—इफिसकर ५:२९.

याचा काय अर्थ होतो: हे तत्त्व आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ज्या गोष्टी करणं गरजेच्या आहेत त्या करण्याचं प्रोत्साहन देतं. एका अहवालानुसार दिसून येतं की बऱ्‍याचदा आरोग्याशी संबंधित असलेल्या समस्या आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे निर्माण होतात. म्हणूनच आपण जीवनात योग्य निवड केली तर आपलं आरोग्य चांगलं राहू शकतं.

तुम्ही काय करू शकता:

  • पौष्टिक आहार घ्या. आहारात अशा गोष्टींचा समावेश करा ज्या पौष्टिक आहेत आणि पुरेसं पाणी प्या.

  • शारीरिक हालचाल करत राहा. आपलं वय कितीही असलं तरी शारीरिक मेहनतीचं काम केल्याने आपलं आरोग्य सुधारू शकतं. अपंगत्व किंवा दीर्घकाळाचा आजार या गोष्टींमुळे आपण जास्त करू शकत नसलो तरी काही प्रमाणात शारीरिक मेहनत केल्याने आपल्याला फायदा होऊ शकतो. आपल्या कुटुंबातले सदस्य किंवा डॉक्टर आपल्याला व्यायाम करण्यासाठी प्रोत्साहन व सल्ले देतील, पण त्यातून फायदा मिळवण्यासाठी आपण स्वतः पाऊल उचलणं गरजेचं आहे.

  • पुरेशी झोप घ्या. दीर्घकाळापर्यंत पुरेशी झोप न मिळाल्यामुळे बऱ्‍याच लोकांना गंभीर आजार होऊ शकतात. लोक त्यांच्या झोपेच्या वेळेत इतर गोष्टी करण्याची निवड करतात आणि म्हणून त्यांची झोप पूर्ण होत नाही. तेव्हा निरोगी राहण्यासाठी पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे.

वाईट सवयींपासून दूर राहा

बायबल तत्त्व: “शरीराला व आत्म्याला दूषित करणाऱ्‍या सर्व गोष्टींपासून स्वतःला शुद्ध करू या.”—२ करिंथकर ७:१.

याचा काय अर्थ होतो: तंबाखू आणि इतर घातक पदार्थांमुळे आपल्याला भयानक आजार होऊ शकतो आणि आपला मृत्यूसुद्धा होऊ शकतो. हे पदार्थ टाळल्यामुळे आपण आपलं शरीर दूषित होण्यापासून वाचवू शकतो.

तुम्ही काय करू शकता: उदाहरणार्थ, तुम्हाला सिगरेटचं व्यसन सोडायचं असेल तर एक तारीख ठरवा आणि त्याची नोंद कॅलेंडरवर करा. ठरवलेल्या तारखेच्या आदल्या दिवशी, तुमच्या जवळ असलेल्या सिगरेट्‌स, लाईटर आणि इतर संबंधित वस्तू टाकून द्या. तसंच, अशा ठिकाणी जायचं टाळा जिथे लोक हे व्यसन करतात. तुमच्या निर्णयाबद्दल तुमच्या कुटुंबाला आणि मित्रांना सांगा, कारण असं केल्याने ते तुम्हाला मदत करू शकतील.

इतर बायबल तत्त्वं:

तुम्हाला तुमच्या भाषेत बायबलची एक प्रत हवी असेल तर तुमच्या परिसरात राहणाऱ्‍या यहोवाच्या साक्षीदारांशी तुम्ही संपर्क करू शकता

सुरक्षेच्या बाबतीत सावधगिरी बाळगा.

“तू नवीन घर बांधशील तेव्हा धाब्याला कठडा बांध; नाही तर एखादा मनुष्य तिथून खाली पडल्यास तू आपल्या घराण्यावर हत्येचा दोष आणशील.”—अनुवाद २२:८.

रागावर नियंत्रण ठेवा.

“ज्याला लवकर क्रोध येत नाही तो महाबुद्धिवान होय; उतावळ्या स्वभावाचा माणूस मूर्खता प्रगट करतो.”—नीतिसूत्रे १४:२९.

खाण्यावर नियंत्रण ठेवा.

“खूप खाणाऱ्‍या . . . लोकांशी मैत्री करू नकोस.”—नीतिसूत्रे २३:२०, ईझी-टू-रीड व्हर्शन.