व्हिडिओ पाहण्यासाठी

यहोवाच्या साक्षीदारांमध्ये पगारी पाळक आहेत का?

यहोवाच्या साक्षीदारांमध्ये पगारी पाळक आहेत का?

 यहोवाचे साक्षीदार पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांचे अनुकरण करतात त्यामुळे त्यांच्या संघटनेत पाळक आणि सामान्य लोक असे वर्गीकरण नसते. सर्व बाप्तिस्माप्राप्त साक्षीदार देवाने नियुक्‍त केलेले सेवक आहेत आणि सर्व जण देवाच्या राज्याची सुवार्ता सांगण्याच्या व शिकवण्याच्या कार्यात सहभाग घेतात. यहोवाचे साक्षीदार जवळजवळ १०० लोकांनी बनलेल्या मंडळ्यांमध्ये एकत्रित होतात. मंडळीमध्ये आध्यात्मिक रीत्या प्रौढ बांधवांना “वडील” म्हणून नेमण्यात येते. (तीत १:५) मंडळीतील वडील ही जबाबदारी कोणतीही आर्थिक मदत न घेता पार पाडतात.