व्हिडिओ पाहण्यासाठी

गंभीर आजारपण​—बायबल काही मदत करू शकेल का?

गंभीर आजारपण​—बायबल काही मदत करू शकेल का?

बायबलचं उत्तर

 हो. आजारी असलेल्या आपल्या सेवकांची देवाला काळजी आहे. देवाच्या एका विश्‍वासू सेवकाबद्दल बायबलमध्ये असं म्हटलंय: “तो अंथरुणाला खिळलेला असताना यहोवा त्याला सांभाळेल.” (स्तोत्र ४१:३) तुम्हालाही जर एखादा गंभीर आजार असेल, तर या तीन गोष्टी तुम्हाला त्याचा सामना करायला मदत करू शकतील:

  1.  १. सहनशक्‍तीसाठी प्रार्थना करा. प्रार्थना केल्यामुळे तुम्हाला “सर्व समजशक्‍तीच्या पलीकडे असलेली देवाची शांती” मिळेल. यामुळे तुमच्या मनातली भीती आणि चिंता कमी होईल आणि तुम्हाला होणारा त्रास सहन करायची ताकद मिळेल.​—फिलिप्पैकर ४:६, ७.

  2.  २. आनंदी राहायचा प्रयत्न करा. बायबल म्हणतं: “आनंदी असल्यामुळे माणूस निरोगी राहतो. पण सतत उदास राहणं हे हळूहळू मरण्यासारखं आहे.” (नीतिसूत्रे १७:२२, गुड न्यूज ट्रान्सलेशन) म्हणून, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा आणि हसायला शिका. कारण यामुळे तुमचा तणाव कमी होईल आणि तुमच्या आरोग्यावरही चांगला परिणाम होईल.

  3.  ३. भविष्याबद्दलच्या आशेवर पूर्ण भरवसा ठेवा. एक पक्की आशा असल्यामुळे गंभीर आजारपणातही तुम्हाला आनंदी राहता येईल. (रोमकर १२:१२) बायबल सांगतं की भविष्यात असा एक काळ येईल, जेव्हा “मी आजारी आहे,” असं कोणीही “म्हणणार नाही.” (यशया ३३:२४) आज असे बरेच आजार आहेत ज्यांवर विज्ञानाला काहीच उपाय सापडलेला नाही. पण बायबल सांगतं, की देव भविष्यात असे सगळे गंभीर आजार पूर्णपणे काढून टाकणार आहे. बायबल सांगतं की त्या वेळी म्हातारे लोकही तरुण होतील. याबद्दल बायबल असं म्हणतं: “त्याचं शरीर तरुणपणात होतं त्यापेक्षा ताजंतवानं व्हावं. त्याच्या तारुण्यातला उत्साह त्याला परत मिळावा.”​—ईयोब ३३:२५.

 टीप: गंभीर आजारपणाचा सामना करण्यासाठी, देवाने बायबलमध्ये दिलेला सल्ला उपयोगी आहे ही गोष्ट यहोवाचे साक्षीदार मान्य करतात. पण त्यासोबतच ते औषधोपचारही घेतात. (मार्क २:१७) असं असलं तरी, आम्ही कोणताही ठरावीक औषधोपचार घेण्याचा सल्ला देत नाही. कारण आरोग्याच्या बाबतीत प्रत्येकाने स्वतःचा निर्णय घ्यावा असं आम्हाला वाटतं.