व्हिडिओ पाहण्यासाठी

आपल्या दुःखासाठी देव जबाबदार आहे का?

आपल्या दुःखासाठी देव जबाबदार आहे का?

बायबलचं उत्तर

 बायबल ठामपणे म्हणतं की आपल्या दुःखासाठी देव जबाबदार नाही. माणसांसाठी देवाचा जो उद्देश होता त्यात दुःख कुठेच नव्हतं. पण मग, दुःखासाठी कोण जबाबदार आहे? पहिल्या जोडप्याने देवाच्या राज्य करणाच्या अधिकाराविरुद्ध बंड केलं आणि स्वतःसाठी बऱ्‍यावाइटाचे स्तर ठरवले. त्यामुळे ते देवापासून दूर गेले आणि त्याचे वाईट परिणाम त्यांना भोगावे लागले.

 त्यांच्या चुकीच्या निर्णयाचे परिणाम आजपर्यंत आपण भोगत आहोत. पण या सगळ्याला देव कोणत्याही प्रकारे जबाबदार नाही.

 बायबल म्हणतं: “संकट येतं, तेव्हा ‘देव माझी परीक्षा घेतोय,’ असं कोणी म्हणू नये. कारण कोणीही वाईट गोष्टींनी देवाची परीक्षा घेऊ शकत नाही आणि तोसुद्धा वाईट गोष्टींनी कोणाची परीक्षा घेत नाही.” (याकोब १:१३) दुःख कोणावरही कोसळू शकतं; मग ते धार्मिक लोक असले तरी.